भरधाव ट्रकची पाण्याच्या टॅंकरला जोरदार धडक

कुरकुंभ- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीत पाण्याचा टॅंकर आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोनजण जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.22) घडली आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत नाना विठ्ठल साळुंखे (वय 55, रा. कुरकुंभ, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रकचालक सखाराम मल्हारी खराडे (वय 27, रा. चाकण, शेळपिंपळगाव, इंडियन आईल कंपनी जवळ, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाना साळुंखे हे गुरूवारी (दि.22) (एमएच 14-4256) हा पाण्याचा टॅकर घेऊन झाडांना पाणी देण्यासाठी निघाले होते. टॅंकर बाजूला थांबवून कामगार गंगाधर शंकर शेलार हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील 75+ 350 या दुभाजकातील झाडांना टॅंकरच्या पाईपाद्वारे पाणी घालत होते. यावेळी पाण्याच्या टॅकरच्या पाठीमागे 20 फूट अंतरावर बॅरीगेट आणि लाल रंगाचे झेंडे लावली होती.
यादरम्यान, सोलापूर बाजूने पुणे बाजूकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (एचएच 14 बीजे 1936) या ट्रकने थांबलेल्या पाण्याच्या टॅकरला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये टॅंकर चालक नाना साळुंखे यांच्या डोक्‍यास किरकोळ दुखापत झाली. तर, ट्रकचालक सखाराम खराडे यांना पायास गंभीर मार लागला. अपघातात ट्रकच्या समोरील बाजूचे तर पाण्याच्या टॅकरच्या मागील बाजूचे नुसकान झाले आहे. हा अपघात ट्रकचालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस हवालदार के. बी. शिंदे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)