भरधाव टेम्पोने पादचाऱ्यास चिरडले

महाळुंगे इंगळे- महाळुंगे इंगळे (ता. खेड) हद्दीतील जिना कंपनीच्या प्रवेश द्वारालगत शुक्रवारी (दि. 22) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पादचाऱ्यास टेम्पो (एमएच 12 सीएच 4162) ची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संबंधित टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह तसाच पुढे निघून गेल्याने त्याच्यावर आज (शनिवारी) सकाळी आठच्या सुमारास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र ज्ञानदेव गुंड (वय 30, रा. कातळवेडा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. तर विनोद शिंदे (पूर्ण नाव व पूर्ण पत्ता समजला नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. तर चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय ज्ञानदेव मोघे (वय 48, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम कठोरे व त्यांचे अन्य सहकारी पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)