भरधाव कारच्या धडकेत दोघांचा बळी

डॉ. आंबेडकर भवन परिसरात अपघात : कारचालक अटकेत

पुणे – भरधाव कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना डॉ. आंबेडकर भवन शेजारील रस्त्याजवळ शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

या अपघातात कार इतकी भरधाव होती, की कारने गॅरेजमध्ये उभ्या केलेल्या चार चारचाकी आणि दोन दुचाकी अशा 6 वाहनांना उडवले. यावेळी गॅरेजमध्ये काम करत असलेला एक कामगार कारच्या काचेवर जाऊन आदळला. गॅरेजमध्ये सुमो जीप दुरुस्तीसाठी घेऊन आलेला चालक जण दोन्ही कारमध्ये अडकला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना गॅरेजमधील कामगार आणि नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात भरती केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी कार चालकास अटक केली आहे.

-Ads-

अरूण शिवाजी गायकवाड (57 रा. डी.वाय. हॉस्पिटलसमोर, वल्लभनगर, पिंपरी) व गॅरेजमधील कामगार फ्रॅंक अलेक्‍झेंडर डीक (45, रा.न्यू मोदी खाना, एसआरए बिल्डींग, भवानी पेठ) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी कार चालक राजेंद्र वसंत लोडगे (45, रा.नसरापूर) याला अटक केली आहे.

मृत फ्रॅंक हा आंबेडकर भवन शेजारील केईएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार पेंटिंग व दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये कामगार आहे. तर गायकवाड हे त्यांची सुमो कार दुरुस्त करण्यासाठी तेथे आले होते. दुपारी दीडच्या सुमारास गॅरेज समोरील रस्त्यावर त्यांचे काम सुरू होते. गायकवाड हे सुमोजवळ थांबले होते. तर फ्रॅंक हा कार दुरुस्त करत होता. याच सुमारास लोडगे हा त्याच्या आजारी आईला ससून रुग्णालयात घेऊन जात होता. यावेळी गॅरेजजवळ आले असता त्याचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले.

यामध्ये त्याने तेथे उभ्या असलेल्या चार कार आणि दोन दुचाकींना त्याने उडवले. यामध्ये गायकवाड हे दोन कारमध्ये अडकले तर फ्रॅंक हा एका कारच्या काचेवर जाऊन आदळला. दोघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तेथील नागरिकांनी तातडीने दोघांनाही तातडीने जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी कार चालक लोडगे याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. सी. शिंदे करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)