भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे – भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना 29 जानेवारी रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास चंदननगर येथील टाटागार्डन चौकात घडली. अपघातानंतर कारचालक पसार झाला असून विमानतळ पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मॅन्युअल कार्लोस खरात (68, रा. ओम गंगोत्री अपार्टमेंट, वडगांवशेरी) असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दत्ताराम जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात हे त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी भरधाव कारची त्यांना धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक ए. एम. आठरे अधिक तपास करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)