भरधाव कंटेनरच्या धडकेने हॉटेल कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

कामशेत, (वार्ताहर) – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत हद्दीतील एका ढाब्यासमोर महामार्ग ओलांडताना हॉटेल कर्मचाऱ्याला भरधाव जाणाऱ्या कंटेनरची धडक बसून जागीच मृत्यू झाला.

बुधवार दि. 9 रोजी रात्री आठच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निसर्ग ढाब्यासमोर हॉटेल जय मल्हारचा कर्मचारी प्रकाश कार्तिक देवनाथ (वय 25, मूळ रा. पश्‍चिम बंगाल, सध्या रा. जय मल्हार हॉटेल, कामशेत) हा रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या कंटेनरची (एमएच 4 जीआर 3717) जोरदार धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक फरार झाला, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)