भरतीचे आश्‍वासन; प्राध्यापकांचे आंदोलन स्थगित

पुणे – महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीला राज्य शासनाकडून मान्यता दिल्यानंतरही प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू न झाल्याने नेट-सेट पात्रताधारक संघर्ष समितीने दि.3 जानेवारीपासून आंदोलन पुकारले होते. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्याच निर्णय समितीने घेतला आहे.

राज्यातील “नेट’-“सेट’ पात्रताधारकांनी दि.3 जानेवारीपासून उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले होते. प्राध्यापक भरतीला मान्यता देऊनही त्याबाबतची कार्यवाही सुरू होत नसल्याने उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाची माहिती देण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची भेट घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती संकलित केली जात आहे. ती एकत्रित झाल्यानंतर प्राध्यापक भरती करण्यास महाविद्यालयांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सहायक प्राध्यापक भरतीच्या जाहिराती निघण्याची शक्‍यता आहे. उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पुढील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)