भरतपूरमध्ये अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ केला शूट

जयपूर -राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर तीन तरुणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपींनी बलात्कार होत असतानाचा व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलैना पोलीस ठाण्याअंतर्गत 31 मार्चच्या रात्री पीडित तरुणीचे अपहरण झाले होते. अपहरण केल्यानंतर पीडित तरुणीला गावाबाहेरील एका दुकानात नेऊन तिथे तिच्यावर हे कृत्य करण्यात आले. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला रस्त्यावर सोडून पळ काढला. पीडित तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली.

तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींच्या फोन लोकेशनच्या सहाय्याने त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)