भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी पोलिसांना 10 पानी निनावी पत्र

इंदोरआध्यात्मिक गुरु  भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर आता पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले आहे. या पत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. भय्यू महाराज दुसऱ्या पत्नीच्या वर्तनामुळे तणावात होते. त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केली, असे या निनावी पत्रात म्हटले आहे.

भय्यू महाराज यांनी 12 जून रोजी गोळी मारुन आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये तणावातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. मात्र आता पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले आहे. पोलिसांनी या पत्राच्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे. हे पत्र तब्बल 10 पानी असल्याची माहिती पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्र यांनी दिली. मात्र या पत्रात नेमकं काय काय नमूद आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निनावी पत्र पाठवणाऱ्याने आपली ओळख भय्यू महाराजांचा सेवक अशी सांगितली आहे. भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषीचं भय्यू महाराजांशी वर्तन चांगले नव्हते. त्यामुळेच ते तणावात होते, असं या पत्रात म्हटलं आहे.  दुसरीकडे आयुषी यांची आई राणी शर्मा यांनी मात्र पत्रातील आरोप फेटाळले आहेत. निनावी पत्रातील मजकूर हा तथ्यहीन आणि मनाला येईल तसा लिहिलेला आहे, असे राणी शर्मा यांनी म्हटले आहे.

भय्यू महाराज यांनी 12 जून रोजी गोळी मारुन आत्महत्या केली होती. यानंतर भय्यू महाराज यांच्या श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टने एक पत्र जारी करुन, माध्यमांनी चौकशीपर्यंत कुटुंबीय किंवा संस्थेच्या सदस्यांशी संपर्क न करण्याचं आवाहन केले होते. ट्रस्टचे सचिव तुषार पाटील यांनी पत्र प्रसिद्ध करत, पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याचा अहवाल सार्वजनिक होईल, त्यानंतरच आम्ही माध्यमांना आमची प्रतिक्रिया देऊ, असे म्हटले होते.

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी 12 जून 2018 रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)