भय्यू महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप

इंदूर: भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये तणावामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पत्नी आणि पहिल्या पत्नीची मुलगी यांच्यातील वादामुळे भय्यू महाराजांनी टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने सावत्र आईवर आरोप केले आहेत. कुहू ही भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवीची मुलगी आहे. त्यांची दुसरी पत्नी आयुषी आणि कुहू यांच्यात अलबेल नव्हतं. भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर कुहूने आयुषी यांच्यावर आरोप केले आहेत.

सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप कुहूने केला आहे.  तर कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असं आयुषी यांचं म्हणणं आहे. कुहू पुण्यात शिकते. त्यामुळे भय्यू महाराजांचं पुण्यात येणं-जाणं होत असे. पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी 49 वर्षीय भय्यू महाराज यांनी ग्वाल्हेरमधील डॉ. आयुषी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)