भय्यु महाराजांची आत्महत्या नव्हे, हत्या : रामदास आठवले 

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली – भय्यु महाराज यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असण्याची शक्‍यता आहे, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्महत्या केली की हत्या याबाबत चर्चा सुरु होती. सुरुवातीला त्यांनी आत्महत्याच केली अशी माहिती समोर आली होती.

भय्यूजी महाराज हे आत्महत्या करणे शक्‍य नाही, असे त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी मला सांगितले. त्याचमुळे या प्रकरणात काही काळंबेरं असेल तर ते शोधून काढावे. यासाठीच मी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तसेच ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचे मलाही वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भय्यूजी महाराज यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध होते. मी त्यांच्या पार्थिवावर झालेल्या अंत्यसंस्कारालाही हजर होतो. भय्यूजी महाराजांच्या हत्येमागे नेमकं काय कारण आहे हे सांगता येणे कठीण आहे. मात्र ते कारण शोधून काढण्यासाठीच त्यांच्या मृत्यूची चौकशी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात मी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशीही चर्चा केली आहे, असेही आठवले यांनी म्हटले आहे. फोनवरून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रातही सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे. या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)