भयमुक्‍त वातावरणासाठी महिला सायकल रॅली

पिंपळे सौदागर – रस्त्यावरील दहशत, पर्स हिसकावणे, सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड यामुळे रात्रीच्या वेळी महिला घराबाहेर पडण्यास घाबरतात. त्यांच्यातील ही भिती दूर करण्यासाठी तसेच भयमुक्त वातावरणाचा संदेश देण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवारी रात्री महिला सुरक्षा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात झाली. परिसरातील विविध क्षेत्रातील सुमारे अडीचशे महिलांनी यात सहभाग नोंदविला. पुष्पा संचेती, सायली सुर्वे, मनीषा मचाले, मिथिला डहाके, वैशाली चौधरी यांच्यासह परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.

या रॅलीला शिवार चौकातून सुरुवात करण्यात आली. पुढे कोकणे चौक, गोविंद यशदा चौक, साई अँबियन्स चौक, कुणाल आयकॉन रस्ता मार्गे शिवार चौकात रात्री अकरा वाजता रॅलीची सांगता करण्यात आली.

नगरसेविका शीतल काटे म्हणाल्या, धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास महिलांना वेळ नाही त्याच बरोबर रोजची रस्त्यावरची दहशत यामुळे महिला घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मात्र महिलांनी खंबीरपणे अशा वाईट वृत्तीचा सामना करण्यासाठी पुढे आले पाहिजे. सध्याच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्यामुळे महिलांनी न घाबरता मुक्तपणे वावरले पाहिजे तसेच स्वतःचे आरोग्य, वायू प्रदूषण व रस्त्यावरील वाहतुकीचे संतुलन नियमित चांगले ठेवण्यासाठी रोज दिवसातील काही तास तरी सायकल वापरण्याची काळाची अत्यंत गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)