भणंग शाळेत गोवर रुबेला लसीकरण मोहीम

विद्यार्थ्याना गोवरबाबत माहिती देताना रुपाली कदम, शेजारी डी. टी. धनावडे, अशोक लकडे.

मेढा, दि. 11 (प्रतिनिधी) – जावली तालुक्‍यातील भणंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत गोवर रुबेला या आजाराबाबत देण्यात येणाऱ्या लसीबाबत जनजागृती करण्यासाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या संवाद कार्यक्रमात भणंग आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका रुपाली कदम, शाळेचे मुख्याध्यापक डी. टी. धनावडे, शाळेचे नोडल अधिकारी अशोक लकडे, शाळेतील शिक्षक शंकर ओंबळे,उषाकिरण धनावडे, आरोग्य परिचारीका यशोदा जाधव व विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी अशोक लकडे यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची सविस्तर माहिती दिली. आरोग्य सेविका रुपाली कदम यांनी गोवर रुबेला आजार, त्याचे परिणाम व लसीकरणाचे फायदे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मुख्याध्यापक डी. टी. धनावडे यांनी या लसीकरण मोहिमेंतर्गत जनजागृती करण्यासाठी शाळेत आयोजित केलेल्या विविध स्पर्धेविषयी माहिती दिली. अशोक लकडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्तविक डी. टी. धनावडे यांनी केले तर आभार शंकर ओंबळे यांनी मानले. संवाद कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)