पुणे – शहरात भटक्‍या कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षभरात जितके मृत्यू स्वाईन फ्लू, डेंग्यूने नाही झाले तितके रेबिजमुळे झाले आहेत. तर, शहरात कुत्र्यांनी चावा घेतलेले नागरिक जवळपास सात हजार आहेत. त्यामुळेच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्मार्ट ट्रॅकिंग पध्दत अवलंबण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून यासाठी साधारण दोन कोटींहून जास्त खर्च करण्याची तयारी पालिकेने दाखविली आहे.

शहरात भटक्‍या कुत्र्यांची नेमकी संख्या किती, त्यापैकी किती जणांचे निर्बिजीकरण झाले आहे आणि किती जणांना रेबिज प्रतिबंधक लस दिली आहे, याबाबतच्या माहितीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाचे लसीकरण झाले आहे यापासून तो कुत्रा कोठे आहे इथपर्यंत माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. या धोरणाचा आराखडा 18 सप्टेंबरला मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. आतापर्यंत भटक्‍या कुत्र्यांचे ट्रॅकिंग, त्यांचे लसीकरण आदी कामांसाठी चार वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची निवड केली होती. मात्र, आता एक ते दोनच संस्थांच्या माध्यमातून हा पूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)