“भटकंती सह्याद्री’ने केली रायरेश्‍वराची स्वच्छता

वाई – 31 डिसेंबर म्हटल की पार्ट्या, नववर्षाच्या जल्लोषाच्या नावाखाली धांगडधिंगाना अशीच काही परंपरा रुढ होत असतानाच या सर्व प्रकारांना बगल देत वाई येथील युवकांनी महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आसलेल्या रायरेश्‍वर किल्ल्यावर जाऊन स्वच्छता अभियान राबवत रायरेश्‍वर चकाचक करुन नवीन वर्षात एक नवा आदर्श घालून दिला आहे.

31 डिसेंबर निमित्त किल्ले रायरेश्‍वर येथे स्वच्छता मोहिम आणि इंग्रजी नववर्ष साजरा करण्यासाठी गडावर पार्ट्या करायला येणे, दारु प्यायला येणे अशा पर्यटकांसाठी भटकंती सह्याद्रीच्या युवकांनी जागता पहारा ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या किल्ले रायरेश्‍वरावर घेतली त्याच रायरेश्‍वरवर आज आपल्याला प्लॅस्टिकचे कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. याठिकाणी येणारे पर्यटक हे जागोजागी प्लॅस्टिकचा बाटल्या, खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिक पिशव्या, गुटख्यांचे पॅकेटस्‌, दारुचा बाटल्या इत्यादी गोष्टी सर्रास फेकून देतात. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरली असून त्यापार्श्‍वभूमीवर भटकंती सह्याद्री परिवार वाईया ग्रुपने 31 डिसेंबरलाकिल्ले रायरेश्‍वर येथे स्वच्छता मोहिम राबिवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मोहिमेत ग्रुपचे 20 सदस्य सामिल झाले होते. तसेच या स्वच्छता मोहिमेमध्ये रायरेश्‍वर जिल्हा परिषद शाळेतील पाहिली ते सातवी पर्यंतचे सर्व लहान मुले आणि त्यांचे शिक्षक शिंदे आणि जगताप हे देखील सामिल झाले. यावेळी महादेव मंदिर परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. नंतर गोमुख कुंड परिसर, मंदिरापासून ते शिडीपर्यंतच्या मार्गातील सर्व कचरा उचलून पोत्यांमध्ये भरुन त्याची विल्हेवाट लावली. या मार्गामध्ये सुमारे 20 पोती कचरा गोळा केला. यानंतर उपक्रमामध्ये सामिल झालेल्या शाळेतील लहान मुलांना उदय मुंगसे-गायकवाड (मुंबई) यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून बिस्किट आणि श्रीखंड गोळ्या यांचे वाटप भटकंती सह्याद्रीची परिवारातील प्रत्येक सदस्याने केले. तसेच या विद्यार्थ्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक दोन्ही शिक्षकांनी भटकंती सह्याद्रीची परिवाराचे अभिनंदन केले.

यावेळी भटकंती सह्याद्रीची ग्रुपचे सदस्य सौरभ जाधव, रोहित मुंगसे, अनिल वाशिवले, अजय वाशिवले, अतुल वाशिवले, नितीन वाशिवले, साहिल घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रायरेश्‍वर जिप. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)