भगवान रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या – भाजप खासदार 

नवी दिल्ली – अयोध्यामध्ये एकीकडे राम मंदिर निर्मितीसाठी संत समाजापासून ते भाजप व राष्ट्रीय  स्वयंसेवक संघासारख्या संघटना निदर्शने करत आहेत. तर दुसरीकडे एका भाजप खासदाराने ‘अयोध्येत भगवान रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्यावे’, असे मागणी करणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहले आहे.

उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार हरी नारायण राजभर यांनी म्हंटले कि, प्रत्येकाला घर मिळावे अशी मोदी सरकारची इच्छा आहे. परंतु, भगवान राम १९९२ पासून एका तंबूत राहत आहेत. थंडी, उन्हाळा आणि पाऊस अशा परिस्थितीत ते राहत असून जिल्हा प्रशासनाने भगवान रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)