भगवान महावीर यांना विविध उपक्रमांद्वारे अभिवादन

जयंतीनिमित्त जनजागृती, शोभायात्रा


रक्‍तदान, देखाव्यांचे सादरीकरण

पुणे- भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने जनजागृती, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तर काही संघटनांच्यावतीने रक्‍तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले.

श्री जैन श्वेतांबर राजस्थानी समाज ट्रस्ट
ट्रस्टच्यावतीने पुणे लष्कर भागातील भोपळे चौक येथे भगवान महावीर यांच्या प्रतिमा स्थापित करून फुलांची सजावट करण्यात आली होती. भवानीपेठ ते कॅम्पपर्यंत मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला. यावेळी माणिक भंडारी, किशोर संघवी, उमेश संघवी, मनोज छाजेड, मनीष सोनिग्रा, विनोद सोळंकी आदी सहभागी झाले होते. भोपळे चौकातील राजस्थानभवनमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन माजी आमदार मोहन जोशी आणि शिवसेनेचे शहर सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्या हस्ते झाले. याच्या आयोजनासाठी सूरज धोका, मनिष चौहान, संदेश ओसवाल, दिलीप ओसवाल, कीर्ती ओसवाल, विपेश सोनिग्रा, कुमार ओसवाल, प्रवीण सोनिग्रा यांनी सहकार्य केले.

श्री सत्ताविसा जैन सिटी ग्रुप
श्री सत्ताविसा जैन सिटी ग्रुपच्यावतीने भवानीपेठ येथील हमाल पंचायत शेजारी पाणपोईचे उद्‌घाटन स्थानिक नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी किरण दुमावत, भरत सोळंकी, तेजेंद्र कोंढरे, नगरसेवक राजेश येनपुरे, किरण सोळंकी, डॉ. पारस शहा, मुलचंद ओसवाल, ग्रुपचे अध्यक्ष सोहन ओसवाल, वस्तीमल सोळंकी, रणजित कावेडिया, कमलेश पार्लेचा, किर्ती परमार आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मातंग समाज संघटना
मातंग समाजामध्ये जैन विचार, आचार यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जैन विचार मंचची स्थापना करण्यात आली आहे. जैन विचार मंच आणि भारतीय मातंग युवक संघटना यांच्यावतीने महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंचचे निमंत्रक आणि संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल साठे यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मिरवणुकही काढण्यात आली. यावेळी शंकर वाघमरी, राजेंद्र भोंडवे, पांडुरंग दुबळे, विवेक बुचडे, सनी भोंडवे, समीर डोलारे, सनी अवघडे, राजेंद्र अडागळे, शिवाजी वाघमारे, सचिन महापूरे, सनी महापूरे, दगडू दुबळे, वैभव गायकवाड, राजू वाघमारे, सोमनाथ कानडे, समीर भोंडवे, शेखर कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री जैन सामुदायिक उत्सव समिती
गोडीजी पार्श्‍वनाथ मंदिर येथून भगवान महावीरांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. श्री मूर्तीपूजक संघ, स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्वेतांबर तेरापंथी समाज, दिगंबर जैन समाजाचे चारही संप्रदायाचे भाविक उपस्थित होते. या मिरवणुकीत भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित देखावे सामीर करण्यात आले. सोन्या मारूती चौकात महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, अजय खेडेकर यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. जैन साधना सदर येथे मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी जैन सोशल ग्रुप यांना पुरस्कार देण्यात आला. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अन्नदान, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. दुष्काळग्रस्त बांधवांसाठी अन्नधान्य, चारावाटप, पाणपोई, पाण्याचे टॅंकर वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या मिरवणुकीचे आयोजन अनिल गेलडा, शरद शहा, संपत जैन, अध्यक्ष चंदुभाई शहा, कचरदास पोरवाल, विजय भंडारी, महावीर कटारिया, अचल जैन, पुखराज जैन, अमोल जव्हेरी, हिरालाल राठोड, आदींनी केले.

आचार्य श्री आनंदऋषीजी नामफलकाला मालार्पण
राष्ट्रसंत आचार्यसम्राट प.पू. श्री आनंदऋषिजी म. सा. यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नामफलकाला जय आनंद ग्रुप यांच्यातर्फे मालार्पण करण्यात आले. 28 मार्च रोजी हा कार्यक्रम झाला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा, कार्याध्यक्ष विजय पारख, सचिव प्रमोद छाजेड, सहसचिव विनोद बाफना, कोषाध्यक्ष संजय कटारिया, विजयकुमार मरलेचा, शांतीलाल देसरडा, प्रवीण तालेडा, संतोष भुरट आणि राजेंद्र सुराणा आदी उपस्थित होते.

संभवनाथ जैन युवक मंडळातर्फे महावीर जयंती साजरी
कांतीलालजी ठाकरमलजी जैन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री संभवनाथ जैन युवक मंडळ आणि श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 425 जणांनी रक्तदान केले. तसेच 2014 जणांची मधुमेह तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक प्रवीण चोरबेले, नगरसेविका राजश्री शिळीमकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र लुंकड, सूरज पोळ, अचल जैन, दिलीप मेहता आदी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)