भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त अन्नदानाचा संकल्प

तळेगाव दाभाडे – येथील महावीर जन्मकल्याणक मंडळाने भगवान महावीरांच्या 2617 व्या जयंतीनिमित गुरुवार (दि.29) रोजी येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलमधील गरीब, गरजू व वंचित रुग्णांना तसेच नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी 600 रुग्ण व नातेवाईकांनी अन्नदान करण्यात आले. यावेळी रोज गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना एक वेळचे मोफत अन्नदान करण्याचा संकल्प करण्यात आला. महावीर जन्मकल्याणक मंडळाने केलेल्या या प्रयत्नामुळे हॉस्पिटल प्रशासन व रुग्ण यांनी समाधान व्यक्‍त केले.

महावीर जन्मकल्याणक मंडळाचे अध्यक्ष चेतन मगनलाल ओसवाल म्हणाले, मावळ तालुक्‍यातील गरीब, गरजू व वंचित रुग्ण या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी येतात त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना औषधोपचाराचा खर्च परवडत नाही. त्यांना वेळेवर जेवण न मिळाल्याने आरोग्यात सुधारणा होत नाही ही गरज ओळखून भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून या हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना तसेच नातेवाईकांना दैनंदिन एकवेळाचे जेवण देण्याचा संकल्प केला आहे. मावळातील इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्यास हे कार्य कायम सुरु राहील. मानव सेवा हीच खरी सेवा असून यातच माणुसकीचे दर्शन होते.

याप्रसंगी पंकज ओसवाल, चेतन ओसवाल, राहुल ओसवाल, जितेंद्र ओसवाल, आकाश ओसवाल, तुषार ओसवाल, विजय गदिया, केयुर शहा, सुमित निलेश ओसवाल, जैनम ओसवाल, संयम ओसवाल,राज ओसवाल, हर्षल ओसवाल, दर्शन ओसवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज ओसवाल यांनी केले. सूत्रसंचालन राहुल ओसवाल यांनी केले. आभार विजय गदिया यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)