भगवानगड-नागलवाडी रस्त्याच्या समस्येला अखेर वाचा फुटली

कवी संजय आंधळे यांच्या प्रयत्नांना यश ः ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्यांचे मिळाले पाठबळ
नगर – शेवगाव तालुक्‍यातील बागलवाडी हे गाव भगवान गडापासून जवळ पायथ्याला वसलेले पाथर्डी तालुका व शिरुर (बीड) या दोन तालुक्‍याच्या सरहद्दीवर असलेले गाव आहे. तसेच भगवानगडमार्गे नागलवाडी ते पाथर्डी येथे जाण्यास 1किमी अंतराचा डोंगराळ मार्ग आहे. दगडगोट्यांचा व निसरडा असा हा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षीत आहे. याठिकाणी अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात झाले. रोजचा शाळकरी व बाजार हाटासाठी हा रस्ता महत्वाचा आहे. परंतु या रस्ताकडे आजपर्यंत कुणाचेही लक्ष गेले नाही.नागलवाडीचे सुपुत्र , सामाजिक कार्यकर्ते कवी संजय आंधळे यांनी गावातील सर्व तरुणांना व ग्राम पंचायत सदस्यांना एकत्र आणुन या रस्त्यासाठी पाठपुरावा करून वाचा फोडली.
ग्रामसभेचा ठराव घेऊन ग्राम योगदान मंडळ नागलवाडी स्थापन करुन संजय आंधळे यांनी सर्वांच्या मदतीने शासकीय व प्रशासकीय जिल्हातील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांना भेटुन व पत्रव्यवहार करुन हि व्यथा सर्वांपर्यंत तत्परतेने पोहचवली व जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांना ग्रामयोगदान मंडळ कार्यकर्ते यांच्यासह भेटून रस्त्याची व्यथा मांडली, जिल्हाधिकाऱ्यांनीहि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कारवाई करण्यास होकार दर्शविला.
भगवानगड-नागलवाडी रस्त्याचे काम व्हावे म्हणुन त्याच्या पाठपुराव्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आ.मोनीकाताई राजळे, शेवगाव पाथर्डी, जि.प.अध्यक्षा शालीतीताई विखे, जि.प.उपअध्यक्षा राजश्रीताई घुले, अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अभियंता जि.प.सार्वजनीक बांधकाम विभाग, तहसीलदार शेवगाव, गटविकास अधिकारी, शेवगाव, जिल्हा नियोजन अधिकारी, , मुख्यकार्यकारी अधिकारी यांना ग्रामसभा ठराव, रस्ता ठराव ,घाटरस्ता छायाचित्रासह पत्र प्रत्यक्ष सादर केले. यासाठी गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच ग्राम योगदान मित्र मंडळ – सर्व तरुणवर्ग यांनी यासाठी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)