भगवद्‌गीतेतील विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याची गरज – मोहन भागवत

पुणे – भगवद्‌गीता समजून घेऊन, त्यातील विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. एवढी तपस्या केली तरी प्रत्येक भारतीय व्यक्‍तीला प्रभावी रूपात विश्‍वगुरू म्हणून जगापुढे उभा करण्याची क्षमता भगवद्‌गीतेत आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.

गीताधर्म मंडळाच्या “गीतादर्शन मासिक-सुवर्ण महोत्सव वर्षारंभ’ स्मरणिका प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दाता, कार्यवाह विनया मेहेंदळे, मोरेश्‍वरबुवा जोशी उपस्थित होते. याप्रसंगी वसुधा पाळंदे यांना सरस्वती आपटे पुरस्काराने भागवत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गीताधर्म हे राष्ट्रधर्म आहे, असे सांगून भागवत म्हणाले, गीतेच्या दृष्टीने स्वत: सत्याच्या दिशेने यात्रा करीत सर्व लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी जी जी कर्म जशी करावी लागतात, तशी करीत राहणे हेच मनुष्याचे जीवन आहे. गीतेचे हेच विचार भारतीय मनुष्यांनी जगाला सांगायचे आहे. म्हणून भगवद्‌गीतेचा अभ्यास केला पाहिजे. चिंतन केले पाहिजे. गीतेचे विचार घराघरांपर्यंत पोहचविणे आवश्‍यक आहे. माणसांनी कसे जगले पाहिजे, याचे भगवद्‌गीतेतील उदाहरणासह भागवत यांनी उलगडून सांगितले. गीतेचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, त्याचे वास्तव त्यांनी मांडले. मुकुंद दातार यांनी प्रास्ताविक केले.

कोणताही पक्ष देश चालवित नसतो, तो समाजामुळे देश चालत असतो. तसेच मी हे केले, तर मी ते केले, असे म्हणणेही योग्य नाही. गीतेचा विचार अंगिकार करून कोणतेही अपेक्षा न करता कर्म करीत राहणे, हेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)