भगतसिंग यांना फाशी दिल्याबद्दल ब्रिटनने माफी मागावी – पाकिस्तान

इस्लामाबाद (पाकिस्तान) -भगत सिंग यांना फाशी दिल्याबद्दल ब्रिटनने माफी मागावी अशी मागणी पाकिस्तानमधील दोन संस्थांनी केली आहे. स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंग यांच्या 87 व्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमात बीएसएमएफ (भगत सिंग मेमोरियल फाऊंडेशन) आणि बीएसएफपी (भगत सिंग फाऊंडेशन पाकिस्तान) या दोन संस्थांनी ब्रिटनच्या राणीने भगत सिंग यांना फाशी देण्याच्या प्रकरणी माफी मागावी अशा मागणीबरोबरच शहीद भगत सिंग यांना राष्ट्रीय महापुरुष (नॅशनल हिरो) घोषित करण्याची मागणी केली आहे.

बीएसएमएफचे अध्यक्ष इम्तियाझ रशीद यांनी भगत सिंग, राजगुरू , सुखदेव या तिघांनाही फाशी दिल्याबद्दल ब्रिटनच्या राणीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. 8 एप्रिल 1929 रोजी भगत सिंग यांनी 8 सहकाऱ्यांसह सेंट्रल असेंब्लीत बॉंब फेकला होता. त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2 वर्षांनी 23 मार्च 1931 रोजी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली होती. भगत सिंग यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध आवाज उठवला होता. एक महान स्वतंत्रता सेनानी म्हणून भगत सिंग सदैव स्मरणार राहणार आहेत. लाहोरमध्ये हा कार्यक्रम मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि सुरक्षिततेत साजरा करण्यात आला


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)