भगतसिंग यांना पाकिस्तानात आदरांजली

लाहोर – शहीद भगतसिंग यांना काल त्यांच्या 87 व्या स्मृतिदिना निमीत्त पाकिस्तानातही आदरांजली वाहण्यात आली. भगतिंसंग यांना पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय हिरो म्हणून घोषित करावे अशी मागणी तेथील दोन संस्थांनी सरकारकडे केली आहे. भगतसिंग यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथेच ब्रिटीशांनी फाशी दिले होते. त्यावेळी ते केवळ 23 वर्षांचे होते. त्याच दिवशी सुखदेव आणि राजगुरू या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही फाशी देण्यात आले होते.

भगतसिंग आणि त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांना लाहोर मधील ज्या शादमान चौकात फाशी देण्यात आले होते, त्या चौकातच भगतसिंग यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या दोन फौंडेशनने दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी भगतसिंग यांच्या काही नातेवाईकांनी भारतातून फोन करून येथील कार्यक्रमाला संबोधीत केले. यावेळी भगत सिंग फौंडेशनचे अध्यक्ष इम्प्तीयाज रशिद यांनी नमूद केले की या तीन युवकांना फाशी दिल्याबद्‌ल ब्रिटनच्या महाराणींनी माफी मागतली पाहिजे. आणि त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.

भगतसिंग यांच्या कार्याची माहिती देणारा धडा पाकिस्तानी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करावा तसेच लाहोर मधील या चौकातील रस्त्याला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भगतसिंग यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यास काही दहशतवादी संघटनांनी विरोध केला होता पण त्या विरोधाला न जुमानता त्यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)