भक्‍ती-शक्‍ती उद्यान सुशोभिकरणाची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची ओळख असलेल्या भक्‍ती-शक्‍ती उद्यानाचे सुशोभिकरण करण्याची मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नगरसेवक चिखले यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी चौकातील भक्‍ती-शक्‍ती समूह शिल्प असून, याठिकाणी देशातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण कायम नागरिकांचे उर्जास्त्रोत आहे. याठिकाणी शहरातील तसेच शहराबाहेरील नागरीक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, या उद्यानाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या उद्यानातील ध्वनीयंत्रणा व जनरेटर बंद आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी लहान असल्याने नागरिकांना पाणी पुरत नाही. या उद्यानाची सीमाभिंत ढासळली असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या उद्यानातील सर्व ग्रेनाईटस्‌ तुटल्या असून, रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. याशिवाय भक्‍ती-शक्‍ती समुह शिल्पाला पुष्पहार घालण्यासाठी शिडी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आसपास स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे या उद्यानात या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याशिवाय या उद्यानाला ऐतिहासिक “लूक’ देण्यासाठी किल्लाचे बुरुज उभारावेत, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)