भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने काकड आरती

महाबळेश्‍वर : काकड आरतीसाठी भाविकांनी केलेली गर्दी.

महाबळेश्वर, दि. 12 (प्रतिनिधी) – कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या महिनाभराच्या कालावधीत महाबळेश्‍वर येथील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या श्री राम मंदिरामध्ये काकड आरतीचा कार्यक्रम सुरु आहे. पहाटेच्यावेळी होत असलेल्या या काकडआरतीला महिला, अबालवृद्धांसह तरुणांची गर्दी होत असून हरिनामाच्या गजरात लोक न्हाऊन निघत आहेत.
महाबळेश्वर मध्ये गेल्याअनेक वर्षांपासून येथील श्रीराम मंदिरात काकड आरतीचा कार्यक्रम सुरु आहे. दररोज पहाटे सहा वाजता मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीच्या अभ्यंगस्नानापासून या कार्यक्रमास सुरुवात होते. अभिषेक, भजन व आरती असा भक्तिमय सोहळा पारंपरिक पद्धतीने सुरु असून महाबळेश्वर येथील माउली भजनी मंडळाच्या सहकार्यांने कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक महिना रोज पहाटे अभिषेकासह धार्मिक कार्यक्रमाने भजनास सुरुवात होते व काकड आरतीने कार्यक्रमाची सांगता होते.
या सर्व धार्मिक कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय होत आहेत. या सर्व कार्यक्रमात महिला वर्ग, आबालवृद्धांसह तरुणाचा सहभाग लक्षणीय असतो, पर्यटक देखील भल्या पहाटे या कार्यक्रमाना हजेरी लावताना पाहावयास मिळतात दररोज येथील भाविकांच्या वतीने मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी प्रसादाचे देखील वाटप अत्यंत भक्तिभावाने होत असते, गेल्या अनेक वर्षांपासून येथील माउली भजनी मंडळाने ही प्रथा सुरु ठेवली असून ऐन गुलाबी थंडीत देखील भाविक मोठ्या संख्येने काकडा आरतीस मंदिरात हजेरी लावत असतात. या कार्यक्रमाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेदिवशी मंदिरामध्ये आकर्षक दिव्याची रोषणाई व येथील प्रसिद्ध कलाकार किसन खामकर यांनी रेखाटलेल्या उत्कृष्ठ रांगोळीने व महाप्रसादाने होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)