भंडारा डोंगरावर रविवारी वृक्षारोपण

देहुरोड – मराठवाडा जनविकास संघ व श्री क्षेत्र भंडारा डोंगर समिती यांच्या वतीने रविवारी (दि. 1) 500 वृक्षांची जाळीसह लागवड हभप शिवानंदजी महाराज, हभप बबृवान वाघ महाराज, हभप कुरेकर बाबा महाराज, हभप बाबुराव महाराज तांदळे व शिवव्याख्याते गजानन वाव्हळ यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान येथे सकाळी साडेनऊ वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रारंभ होईल. यामध्ये वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे लावण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)