भंडारा-गोंदीयाच्या जागेबाबतचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील तिढा अजून कायम

नवी दिल्ली – भंडारा-गोंदीया मतदार संघातील लोकसभेची पोटनिवडणुक येत्या 28 मे रोजी होणार आहे पण या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला हक्क सांगितला आहे.

भाजपच्या तिकीटावर येथून निवडून आलेले खासदार नाना पटोले यांनी भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली आहे. नाना पटोले यांनी आता कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी सन 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा आमची असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. येत्या 3 मे रोजी विधानपरिषदेच्या काहीं जागांसाठी निवडणूक होत आहे. ती झाल्यानंतर या जागेविषयी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले जात आहे.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी याजागेवर दावा सांगण्यासाठी या पोटनिवडणुकीतील उमेदवारीला महत्व आहे. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेस पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. पालघर चे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथेही पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)