संग्रहित छायाचित्र

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे २८  रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. गोंदिया-भंडारा पोटनिवडणुकीत मतदानावेळी झालेला अक्षम्य घोळ, त्यानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, फेरमतदान, जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी यामुळे पोटनिवडणुकीची चुरस कमालीची वाढली आहे.

दहा फेऱ्यांनंतर भाजप आघाडीवर

दहा फेऱ्यांनंतर भाजप उमेदवार हेमंत पटले 3193 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांना पिछाडी

तिसऱ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी 3100 मतांनी पुढे 

तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही आकडेवारीची घोषणा नाही

तुमसर वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या हेमंत पटले यांना आघाडी

तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे

पोस्टल मतांमध्ये भाजप पुढे

मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतांची मोजणी सुरु

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)