“ब्लॅक पॅंथर’ला ऑस्करचे नॉमिनेशन

मार्वल स्टुडिओच्या “ब्लॅक पॅंथर’ला सर्वोत्कृष्ठ सिनेमा म्हणून ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे. या सिनेमाने एक प्रकारे इतिहासच निर्माण केला आहे. कारण अनेक कारणांसाठी हा सिनेमा “पहिला’ ठरला आहे. ऑस्करचे नामांकन मिळवणारा पहिला “सुपरहिरो’सिनेमा तर हा ठरला आहेच. त्याशिवाय 2019 च्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळवणाराही तो पहिला सुपरहिरोचा सिनेमा आहे. कॉस्च्युम डिजाईन, ओरिजिनल स्कोअर, प्रॉडक्‍शन डिजाईन, साऊंड एडिटींग, साऊंड मिक्‍सिंग आणि ओरिजिनल सॉंग या सहा श्रेणींमध्ये “ब्लॅक पॅंथर’ला नामांकने मिळाली होती.

याशिवाय प्रमुख भूमिकेत कृष्णवर्णीय कलाकार असलेला मार्वल स्टुडिओचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमातील चॅडविक बोसमन यांच्याशिवाय अन्य प्रमुख कलाकार बॉक्‍स ऑफिसवर नेहमीच हिट ठरणारे आहेत. 2018 च्या बॉक्‍स ऑफिसच्या रेटिंगनुसार “ब्लॅक पॅंथर’ने जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न केले आहे. या सिनेमाने तब्बल 1,346 अब्ज डॉलरचा धंदा केला आहे. “एम टिव्ही मुव्ही ऍन्ड टिव्ही ऍवॉर्डस’मध्येही या सिनेमाला चार पुरस्कार मिळाले होते. “द डार्क नाईट’ आणि “आयर्न मॅन’ सारख्या सुपरहिरोंच्या सिनेमांच्या स्कोअरलाही “ब्लॅक पॅंथर’ने मागे टाकले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)