ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे – चार वर्षांपूर्वी ओळख झालेल्या व्यक्तीकडून मैत्रीच्या नावाने केल्या जाणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिती विनोद वाघ (वय-45, सिंहगड रोड) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर, महिलेचे पती विनोद वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आशिष धिवार (वय-29) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, विवाहित महिलेचे 17 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक 15 वर्षांचा मुलगा आहे. तर महिलेची धिवार याच्याशी गणेशोत्सवात ओळख झाली होती. महिलेचा मुलगा तेथे ढोल पथकामध्ये सहभागी होता. त्यामुळे तेथे त्याची ओळख झाली. तर त्यानंतर दोघांची मैत्री झाली. त्याने महिलेसोबत फोटो काढले होते. त्याने फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करू लागला होता. तसेच तिला खोटी आश्‍वासने देत होता. तिला फोटो वायरल करून बदनाम करत असल्याची धमकी देऊन त्रास देत असल्याने महिलेने 21 डिसेंबर रोजी राहत्या घरी वीष पिऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. टी. गायकवाड करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)