‘ब्लॅकमेलिंग’च्या वादातून तरुणाचा खून

पिंपरी – प्रेयसी सोबतचे अश्‍लिल फोटो व व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्याचा बनाव आखणाऱ्या प्रियकराचाच त्याच्या मित्रांनी काटा काढला. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

लवकुशकुमार पांडे (वय-25, रा. भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजकुमार अनिल गवारे (वय-21, रा. जुनी सांगवी) गोपाळ मुरारी गायकवाड (वय-21 रा. महाळुंगे.) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकुशकुमार हा सांगवी येथे एका खासगी गुप्तहेर कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता. यावेळी त्याची एका तरुणीशी ओळख झाली व पुढे प्रेमात रुपांतर झाले. यावेळी त्याने दोघांच्या खासगी क्षणाचे त्याचा फोनमध्ये चित्रीकरण केले. संबंधीत फोटो व व्हिडीओ हे कंपनीतील सफाई कामगार व त्याचा मित्र राजकुमार याला देखील “सेंड’ केले. दरम्यान प्रियकर लवकुशकुमार यानेच प्रेयसीला संबंधीत फोटो “व्हायरल’ करण्याची धमकी देत अडीच लाख रुपये मागणारा मेल पाठवला. मात्र, आपले मित्र “ब्लॅकमेल’ करत असल्याचा बनाव त्याने केला.

दरम्यान, राजकुमार यानेही हे व्हिडीओ लवकुशकुमारच्या प्रेयसीला पाठवले. याची कुणकुण लवकुशकुमारला लागली. याच रागातून त्याने राजकुमार व त्याचा मित्र गोपाळ आळंदी येथे बोलावले. जो कोणी माझ्या प्रेयसीला धमकी देत आहे त्याला मी ठार करणार, अशी धमकी दिली. आपणच तिच्या फोटोचा गैरवापर करणार असल्याचे लवकुशकुमार याने सांगितले. आपले पितळ उघडे पडेल या भितीतून राजकुमार याने लवकुशकुमारवर वार केले. गोपाळ यानेही लवकुशवर हल्ला चढवला. यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह वाळके मळा येथील बनाच्या ओढ्याजवळ टाकून त्यांनी पळ काढला. बारा तासाच्या आत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)