ब्लु फिल्म दाखवत पत्नीकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी करणाऱ्या पतीला कौटुंबिक न्यायालयाचा दणका

दरमहा 15 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश

पुणे – ब्लू फिल्म दाखवत पत्नीला अनैसर्गिक शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या पतीला कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला आहे. दरमहा 15 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. जुलै महिन्यात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघे नात्यातील आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांचा ऍरेंज विवाह झाला. तो नोकरी करतो. तर ती गृहिणी आहे. त्याला मोठे घर आहे. त्याचे आई-वडिलही नोकरी करतात. तो तिला ब्लू फिल्म दाखवत असत. मात्र, तिला हे पाहणे आवडत नवहते. त्यामुळे दोघात वाद झाला. यावरून लग्नानंतर अवघ्या एका महिन्याच्या कालावधीच ती माहेरी निघून गेली. पुन्हा आलीच नाही. दरम्यान दोन्हीकडच्या लोकांनी बसून दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या घरच्यांनी तिच्या घरच्यांकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न निष्पळ ठरले. अखेर हा वाद कौटुंबिक न्यायालयात गेला. तिने दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गणेश कवडे यांच्यामार्फत पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला. त्यावेळी माधवच्या राहत्या घराचा फोटो, नावावर असलेली चारचाकी गाडी, बुलेट गाडी यांची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. मात्र, त्याने न्यायालयात पोटगी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी घेतलेल्या उलट तपासणीत घर असून, नोकरी करत आहे. तसेच खासगी मंदिराचे उत्पन्न असल्याचे ऍड. कवडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तो परराज्य, परदेशात विमानाने फिरत होता. हे त्याने टाकलेल्या फेसबुकवरील पोस्टने उघड झाले. याबाबत उलट तपासणीमध्ये त्याने कबुली दिली. त्यानुसार न्यायालयाने माधवीच्या बाजूने निकाल देत तिला दरमहा पंधरा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)