ब्रेन स्ट्रोक (भाग 2)

डॉ. चैतन्य जोशी

स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. स्ट्रोकची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि स्ट्रोक झाल्यावर केली जाणारी तत्काळ उपाययोजना याविषयी जनजागृतीचा अभाव असतो. प्रतिवर्षी जगात 2 कोटी लोकांना स्ट्रोकची बाधा होते. भारतात हे प्रमाण हळुवारपणे वाढत आहे. मलेरिया, क्षयरोग, एचआयव्ही-एड्‌सच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. जीवनशैलीत बदल आणि थोडा व्यायाम करून या दोन्हींवर नियंत्रण मिळवता येतं.

 

भारतात एक लाख रुग्णांमागे 100 ते 150 जणांना पक्षाघात होतो. म्हणजेच त्यांच्या एकूण संख्येचा विचार करायचा झाला तर ही संख्या देशाच्या लोकसंख्येमध्ये 10 ते 15 लाख असू शकेल. यापैकी 15 ते 20 टक्के रुग्ण हे 30 वर्षापेक्षा कमी वयाचे असतात. सध्या तरुणांना वेळी-अवेळी काम, कामाचा जबरदस्त तणाव, स्पर्धात्मक वातावरण, अपुरी झोप, खाण्याच्या बदललेल्या वेळा, व्यायाम न करणे आणि आनुवंशिकपणामुळे या विकाराचा धोका वाढला आहे. उच्च रक्तदाबामुळे मेंदूत रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढते. उच्च रक्तदाबाकडे अनेक रुग्ण दुर्लक्ष करतात. मात्र हा प्रकार म्हणजे एखाद्या “टाइम बॉम्ब’कडे दुर्लक्ष करण्यासारखा असतो.

स्टेम सेल थेरपी- पक्षाघात रुग्णांसाठी वरदान
वैद्यकीय उपचाराच्या अभावामुळे जगातील सर्वाधिक मेंदूचे रुग्ण भारतात आढळतात. मेंदूचा पक्षाघात हा सर्वात मोठा विकार म्हणून समोर आला असून या विकारामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. वैद्यकीय उपचाराच्या अभावामुळे जगातील सर्वाधिक मेंदूचे रुग्ण भारतात आढळतात. मेंदूचा पक्षाघात हा सर्वात मोठा विकार म्हणून समोर आला असून या विकारामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. विशेषत: मेंदूला काही दुखापत झाली तर ती ठीक केली जाऊ शकत नाही, असे बोलले जात होते. मात्र, आता स्टेम सेल थेरपी ही नवीन उपचारपद्धती मेंदूच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

भारतात 9.4 लाख लोक पक्षाघातामुळे त्रस्त आहेत. तर याच विकाराने आतापर्यंत 6.4 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हा विकार झालेल्या बहुतांश व्यक्ती 45 पेक्षा कमी वयोगटातील आहेत. पक्षाघातामुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाही तरी कायमचे अंपगत्व येते. भारतातील 63 लाख लोक हे पक्षाघातातील अपंगत्वाने पीडित आहेत. तर दरवर्षी सुमारे 1.6 लाख लोकांना पक्षाघाताचा झटका येतो, असे इंडियन कौन्सिल ऑफ इंडियाने काही वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मुळात, अनेकदा संबंधित विकाराचे रुग्ण वैद्यकीय उपचाराने बरे होत नाहीत. त्यामुळे या विकारावर योग्य पद्धतीने आणि नवीन उपचारपद्धतीने काम होणे गरजेचे आहे. नव्याने अस्तिवात आलेल्या या उपचारपद्धतीमुळे पक्षाघाताची लक्षणे कमी करणे आणि ज्या भागात इजा झाली आहे तो भाग पुन्हा पूर्ववत करणे शक्‍य होत आहे. त्यामुळे, आता तज्ज्ञ डॉक्‍टर स्टेम सेल थेरपीला महत्त्व देत असून याद्वारे उपचार करण्याचा सल्ला रुग्णांना देत आहेत.

स्टेम सेल थेरपीमुळे जीवनदान
वैद्यकीय सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञान सध्या उपलब्ध असले तरी पक्षाघात झालेल्या रुग्णास योग्य उपचार देण्यास ते कमी पडत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून स्टेम सेल थेरपी ही नवीन उपचारपद्धती वापरण्यात येत आहे. ही थेरपी या रुग्णासाठी नवसंजीवनी ठरत आहे.याशिवाय, या थेरपीमुळे अधू शरीर, हाताच्या व पायाच्या हालचाली तसेच संवेदना नसलेल्या भागात पुन्हा संवेदना निर्माण होतात.

स्टेम सेल’ ही जादूई पेशी आहे. ही पेशी कोणताही आकार घेऊ शकते. पक्षाघात झालेल्या कोणत्याही पेशीत ती रूपांतरित होऊ शकते आणि उपचारात मदत करते. मुळात, स्ट्रोक म्हणजे ब्रेन ऍटॅक असतो. जेव्हा मेंदूला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो. मेंदूला ग्लोकोज आणि ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नाही. तेव्हा पक्षाघाताचा झटका येतो. हा झटका आल्यानंतर तातडीने डॉक्‍टरांकडे जाणे गरजेचे असते. कारण, वेळेवर उपचार झाल्यास धोका टाळता येऊ शकतो. याशिवाय, धुम्रपान करणारे, कमी आणि उच्च रक्तदाब असलेल्या, हृदयरोगी, लठ्ठपणा, व्यायाम न करणारे यांना पक्षाघाताचा सर्वाधिक धोका असतो. दरम्यान, भारतात मलेरिया, क्षयरोग आणि एड्‌स या आजारांच्या एकूण रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी पक्षाघातामुळे मृत्यू होणा-या रुग्णांपेक्षा सर्वाधिक आहे. कारण, बहुतांश लोकांना पक्षाघाताची लक्षणचं माहीत नाहीत. त्यामुळे, वेळेवर उपचार न घेतल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

ब्रेन स्ट्रोक (भाग 1)

ब्रेनस्ट्रोक म्हणजे काय?

ब्रेन स्ट्रोकची लक्षणं…

ब्रेन स्ट्रोक कोणाला होऊ शकतो?

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
44 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)