जाणून घ्या ‘ब्रेन स्ट्रोक’ विषयी… (भाग 1)

डॉ. चैतन्य जोशी

स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. स्ट्रोकची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि स्ट्रोक झाल्यावर केली जाणारी तत्काळ उपाययोजना याविषयी जनजागृतीचा अभाव असतो. प्रतिवर्षी जगात 2 कोटी लोकांना स्ट्रोकची बाधा होते. भारतात हे प्रमाण हळुवारपणे वाढत आहे. मलेरिया, क्षयरोग, एचआयव्ही-एड्‌सच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. जीवनशैलीत बदल आणि थोडा व्यायाम करून या दोन्हींवर नियंत्रण मिळवता येतं.

आपण कित्येकदा ब्रेनस्ट्रोकमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकतो. पण या आजाराचं मूळ आपल्या जीवनशैलीत आहे याची खूप कमी जणांना माहिती आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक असून दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. अशा या ब्रेनस्ट्रोकविषयीची माहिती जाणून घेऊया.

बदलती जीवनशैली, जंक फूडचं अतिरिक्‍त सेवन यामुळे तरुणांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत चाललं आहे. दिवसेंदिवस वाढणारं हे प्रमाण तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकची वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणानुसार सिद्ध झालं आहे. स्ट्रोकपूर्वी जी काही लक्षणं दिसतात ती कित्येकदा आपल्याला कळतच नाहीत. साहजिकच त्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. परिणामी मृत्यूही ओढवतो. एका सर्वेक्षणानुसार जगामध्ये दरवर्षी दोन कोटी लोकांना ब्रेन स्ट्रोक होतो. त्यात साधारणत: 50 लाख लोकांचा मृत्यू होतो. कित्येक लोकांना अपंगत्व येतं. दर दिवशी तीन ते चार लोकांना ब्रेनस्ट्रोकची लागण होते. याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर बेततं. भारतीय लोक या स्ट्रोकविषयी आणि मेंदूमधील बिघाडाविषयी अनभिज्ञ असल्याचं सत्यही या सर्वेक्षणातून उघड झालं आहे. इतकंच नव्हे तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना स्ट्रोकबाबत माहिती नसल्याची बाब उघड झाली आहे. अशा या ब्रेनस्ट्रोकची आपण माहिती करून घेऊया.

 

प्रतिबंधक उपाय
ब्रेन स्ट्रोकवर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं आवश्‍यक आहे. ते बदल कोणते ते पुढीलप्रमाणे –

आपल्याला असणाऱ्या उच्च रक्‍तदाबाची आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्‍यक आहे. तसंच त्यावर संयम कसा ठेवावा याचीही तितकीच माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून पटकन उपचार करता येऊ शकतो.


धूम्रपान टाळावं


कोलेस्टेरॉल वाढवणारे चरबीयुक्‍त पदार्थ टाळावेत


विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात


आहारात टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटोत अँटिऑक्‍सिडंट असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव होतो


ऍरोबिकसारखे व्यायाम नियमित करावेत


मानसिक ताणावर नियंत्रण ठेवावं

कामाच्या ताणामुळे मेंदूतील रक्‍तस्रवाचा धोका
शरीर सर्वाधिक तंदुरुस्त असते ते तरुण वयात. त्यामुळे या वयात शारीरिक व्याधींचा त्रास होत नसल्याचे मानले जात असले तरी सध्या ही परिस्थिती राहिलेली नाही.
शरीर सर्वाधिक तंदुरुस्त असते ते तरुण वयात. त्यामुळे या वयात शारीरिक व्याधींचा त्रास होत नसल्याचे मानले जात असले तरी सध्या ही परिस्थिती राहिलेली नाही. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि त्या बरोबरच कामामध्ये प्रमाणाबाहेर वाढलेल्या ताणामुळे काही प्राणघातक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मेंदूतील रक्‍तस्रवासारख्या प्राणघातक आजाराने होणा-या मृत्यूंची संख्या वाढत आहे आणि त्यातही चिंताजनक बाब म्हणजे 20 ते 30 या वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.

मेंदूतील रक्‍तस्रावाचा विकार यापूर्वी उच्च रक्तदाब असलेल्या जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये दिसून येत होता, पण आता हे प्रमाण तरुणांमध्ये जास्त दिसू लागले आहे. यासाठी त्यांनी एक उदाहरणच दिले आहे. अलीकडेच मोठया पदासाठी असलेल्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणा-या एका 22 वर्षाच्या युवकाला उच्च रक्‍तदाब व डोकेदुखीच्या तक्रारीवरून रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी तो अर्धवट शुद्धीत होता. त्याच्या तपासणीमध्ये त्याच्या मेंदूतून रक्तस्राव होत असल्याचे आढळले.
उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे तरुण वयात मेंदूघात होत असल्याचे आढळले. सध्या तरुणांची लाइफस्टाइल बदलल्याने हे प्रमाण वाढत आहे.

ब्रेनस्ट्रोक म्हणजे काय?

ब्रेन स्ट्रोकची लक्षणं…

ब्रेन स्ट्रोक कोणाला होऊ शकतो?

ब्रेन स्ट्रोक (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)