ब्रेडच्या वाढत्या किमतीने पेटले सूदान

खारतोम: सूदानमध्ये महागाईविरोधात आंदोलन भडकले असून त्याने हिंसक रूप घेतले आहे. या आंदोलनात 19 जण ठार 200 पेक्षा अधिक जखमी झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. सूदान सरकारने गेल्या आठवडयात ब्रेडची किंमत एकदम तीनपट केल्याने लोक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने ब्रेडची किंमत एका सूदानी पौंडावरून (1.41 रुपये) एकदम 3 पौंड (4.43 रुपये) केल्याने लोकांचा संताप झाला आहे. सूदानमध्ये दुष्काळी परिस्थिती असून लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.

सूदानमध्ये बुधवारपासून ही निदर्शने चालू असून गुरुवारी स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलीसांनी केलेल्या गोळीबारात 8 जण मरण पावले. दरम्यान, अल कादरिफ येथे आंदोलनककर्त्यांनी बॅंकेवर दगडफेक केल्याचे सांगण्यात आले आहे. आज अल कादरिफ, अल तायेब, अल अमिनी शहरांमध्ये आंदोलने अधिक हिंसक झाली आणि त्यात दोन पोलीसांसह 19 जण मरण पावले आहेत. सूदानमध्ये उपासमारीची समस्या मोठी आहे. येमेन, नायजेरिया, सोमालिया आणि दक्षिण सूदानमध्ये 15 लाख मुले भूकबळीच्या सीमेवर असल्याचे आणि दक्षिण सूदानमध्ये दुष्काळी स्थिती संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या सहा वर्षांत प्रथमच एखाद्या देशात दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. 2011 मध्ये निर्माण झालेल्या सूदान या नवीनच देशामध्ये अध्यक्ष साल्वा कीर आणि उपाध्यक्ष रीक माचार यांच्यातील वादाने गृहयुध्द सुरू झाले आहे. गेली तीने वर्षे चाललेल्या या गृहयुद्धामुळे स्थिती आणखी बिघडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)