ब्रेक फेल ट्रकने आठ वाहनांना चिरडले

नवले पुलावरील थरार : दोघे अत्यवस्थ, अन्य दोघे गंभीर

पुणे- ब्रेक फेल झाल्यानंतर भरधाव ट्रकने 8 वाहनांना चिरडले असून त्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सिंहगड रोड पोलिसांनी दिली आहे. हा अपघात ऐन वर्दळीच्या वेळी सकाळी अकराच्या सुमारास झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाऱ्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी झालेल्यांना नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात वडगाव उड्डाणपूल नऱ्हे येथे झाला सिक्‍स सिटर, आयशर, कार, रिक्षा अशा तब्बल आठ वाहनांना धडक दिली. यापूर्वी येथे अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत.

-Ads-

धरमपाल रामआसरे भारती ( 40,रा. हांडेवाडी), परशुराम कल्लु यादव (39, रा. हांडेवाडी), प्रकाश गोगावले (रा. गोगलवाडी, ता.हवेली) आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर किरकोळ जखमीमध्ये विलास मारुती चंदेवाड (40, रा. कोंढवा) व रमिज निसारुद्दीन शेख (रा. वारजे) यांचा समावेश आहे. याप्रकरणी एन.रवी नागन (रा. तामिळनाडू) याच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तामिळनाडू पासिंग असलेला ट्रक नारळ वाहतूक करत मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले ब्रीज दरम्यान ट्रकचा ब्रेक फेल झाला. यावेळी ट्रक भरधाव वेगात होता. या भरधाव ट्रकने अनेक वाहनांना अक्षरशः चिरडले. त्यामध्ये काही चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यानंतर थोड्या अंतरावर जाऊन ट्रक थांबला. हा अपघात इतका भयंकर होता, की धडकलेल्या वाहनचालकांच्या किंकाळ्या परिसरात पसरल्या होत्या. वाहनांतील नागरिक जीवाच्या आकांताने ओरडत होते. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर, बघ्यांच्या गर्दीमुळे त्यात आणखी भर पडली.

नागरिकांनी जखमींना वाहनांतून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ट्रक तसेच इतर चारचाकी वाहनांना बाजूला घेण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. झालेल्या भीषण जखमी झालेल्यांना नवले रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. गंभीर जखमी झालेल्यांपैकी चौघांपैकी दोघे अत्यवस्थ असल्याची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच नवले पुलाखालील मिठाईच्या दुकानात टक भरधाव सिमेंट मिक्‍स टॅकर घुसल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला होता.

या घटनेत टेम्पो चालक विलास चंदेवाड यांच्या हातास तर त्यांच्या गाडीवरील कामगार धरमपाल यासही मुकामार तर दुसऱ्या एका टेम्पो चालकाच्या हातापायास गंभीर दुखापत सहा सिटर रिक्षा मधील प्रवाशी निसारुद्दीन शेख व एक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक एस.एन.गवते, पोलीस उपनिरीक्षक आर.एस.भामरे, महिला पोलीस उपनिरीक्षक आर.जे.पाटील

ट्रकने धडक दिलेली वाहने :
टेम्पो(2), सहा सिटर रिक्षा (2), ऍसेंट कार, मारुती सेलेरिओ कार, इंर्टिगा कार, इनोव्हा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)