ब्रेक डान्स करत ट्रॅफिक पोलिसाचे वाहतूक नियमन : व्हिडीओ व्हायरल 

नवी दिल्ली – सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच ट्रेंड होत आहे. या व्हिडिओत एक ट्रॅफिक पोलीस ब्रेक डान्स करत वाहतूक नियंत्रित करत आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्याही पसंतीस पडला आहे.

प्रताप चंद्र खंडवाल  (वय ३३) असे या व्हायरल व्हिडीओमधील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते ओडिशामधील भुवनेश्वर शहरातील वाहतूक विभागात नोकरी करतात. वाहतूक नियमन करताना हिरवा सिग्नल लागल्यावर प्रताप खांडवल आपल्या स्टाईलने डान्स करत लोकांना जाण्यास सांगतात आणि त्यांचा डान्स बघण्यासाठी लाल सिग्नलवर लोक थांबतात.

या व्हिडीओबाबत बोलताना प्रताप खंडवाल म्हणाले, नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. परंतु, माझी डान्स स्टाईल लोकांना आवडते व डान्स बघण्यासाठी ते वाहतूक नियमांचे पालन करतात, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याआधीही मध्यप्रदेशमधील इंदौर शहरातील वाहतूक पोलीस रंजीत सिंह मायकल जॅक्सनप्रमाणे मूनवॉल्क करत वाहतूक नियमन करत होते. त्यांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)