“ब्रेक अप’झाल्याचा कतरिनाला आनंद

रणबीर आणि आलियाची जोडी जुळण्यापूर्वी रणबीर आणि कतरिना हे समिकरण खूप गाजले होते. पण का कोणास ठाऊक त्यांच्यात “ब्रेक अप’ झाले. हे ब्रेक अप झाले ते खूप चांगले झाले, असे आता कतरिना म्हणायला लागली आहे. ब्रेकअप ही गोष्ट आता माझ्यासाठी आशीर्वाद ठरली आहे असं म्हणत ती यावर व्यक्त झाली आहे.

ब्रेकअप हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आशीर्वाद ठरला आहे. आयुष्यात पहिल्यांदाच यामुळे मी स्वत:वर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. मला स्वत:बद्दल कित्येक गोष्टी नव्याने कळू लागल्या आहेत. आपल्याला स्वत:बद्दल काही गोष्टी ठावूक नसतात पण या सगळ्यात मी स्वत:ला नव्याने ओळखू लागले. आता या गोष्टी माझ्यासाठी फारच दुय्यम आहेत’ असं कतरिना म्हणाली.

गेल्या सहा वर्षांपासून ती अभिनेता रणबीर कपूरला डेट करत होती. मात्र कतरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने तिच्याच जवळच्या मैत्रिणीला डेट करायला सुरूवात केली. विशेष म्हणजे आलियाने रणबीरसोबतचे तिचे नाते सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. यामुळे कतरिना खूपच दुखावली होती. पण आता मात्र या सगळ्यातून सावरून तिने नवीन सुरूवात केली आहे.
मला इतरांना दोष द्यायला आवडत नाही. माझी जबाबदारी माझ्या स्वतःवरच आहे. आपण स्वतःबाबत कसा विचार करतो, यावरच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही अवलंबून असतो. जर आपल्याविषयी आत्मियता नसलेले कोणी भेटले तर आपोआपच मध्ये भिंत उभी राहते, हे आता जाणवायला लागले असल्याचे कॅट म्हणाली.

सध्या ती “भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर याच महिन्यात तिची महत्त्वाची भूमिका असलेला “झिरो’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. तिच्या कामातून तिला मिळणारा आनंद हा ब्रेक अपचे दुःख विसरायला लावणारा आहे, हे तिच्या लक्षात आले आहे.

कतरिनासारख्याच भावना काही महिन्यांपूर्वी दीपिकानेही व्यक्‍त केल्या होत्या. आता ती देखील रणवीरबरोबरच्या संसारामध्ये रमण्यास सिद्ध झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)