ब्रेक्‍झिट विधेयकाचे कायद्यात रुपांतर…

महाराणींकडून शिक्कामोर्तब

लंडन – युरोपिय संघामधून इंग्लंडने बाहेर पडण्याच्या विधेयकाला आज अधिकृत कायद्याचा दर्जा प्राप्त झाला. या विधेयकाला महाराणी एलिझाबेथ यांच्याकडून अंतिम मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे या विधेयकानुसार पुढील वर्षी मार्च महिन्यात युरोपिय संघामधून इंग्लंड बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे हाऊस ऑफ कॉमन्सचे प्रवक्‍ते जॉन बेर्कोव यांनी खासदारांना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराणींच्या मंजूरीमुळे ब्रिटनच्या संसदेत झालेल्या कायद्यानुसार युरोपिय संघातील सहभागाचा 1972 सालचा कायदा रद्द होईल. 29 मे 2019 रोजी या युरोपिय संघातील सहभाग संपुष्टात येईल, असेही बेर्कोव यांनी सांगितले. आजच्या कायद्यामुळे युरोपिय संघातील सहभागाचे 20 हजार मुद्दे ब्रिटीश कायद्यात विलीन होतील. त्यामुळे युरोपिय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याची प्रक्रिया अधिक सुकर होईल. “ब्रेक्‍झिट’बाबत संसदेत विधेयक मंजूर होत असताना त्यातील तरतूदी आणि वाक्‍यरचनांबाबत तीव्र वादविवाद झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)