ब्रेक्‍झिट योजनेमुळे अमेरिका-ब्रिटन मुक्त व्यापार करार रद्द

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्‍झिट्‌ योजनेमुळे अमेरिकेबरोबरचा मुक्त व्यापार करार होण्याची शक्‍यता समाप्त होणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनॉळ्ड ट्रम्प चार दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आलेले आहेत.

शुक्रवारी एक मुलखतीत त्यांनी ब्रिटन अमेरिका मुक्त व्यापार कराराची शक्‍यता संपुष्टात येणार असल्याचे वक्तव्य केले. जर थेरेसा मे यांनी ब्रेक्‍झिट संबंधी असा काही करार केला, तर अमेरिका ब्रिटनाऐवजी युरोपियन संघाबरोबर करार करील आणि ब्रिटनबरोबरचा करार रद्द होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

थेरेसा मे यांच्या ब्रेक्‍झिट योजनेमुळे राजीनामा दिलेले माजी परराष्ट्र मंत्री बोरीस जॉन्सन हे उत्तम पंतप्रधान बनतील असेही ट्रम्प यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. आपण ब्रेक्‍झिट प्रकरण वेगळ्या प्रकारे हाताळले असते. त्याबाबत मी थेरेसा मे यांना सल्ला दिला होता, पण त्यांनी तो मानला नाही. अशी माहिती देऊन ट्रम्प पुढे म्हणाले, की त्यांना (थेरेसा मे यांना) वेगळ्या मार्गाने जायचे होते. आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी थेरेसा मे यांच्य विरोधकांच्या हाती मोठे मुद्दे देत मे यांच्यासमोर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)