“ब्रेक्‍झिट’चे भविष्य आज ठरणार; ब्रिटनच्या संसदेमध्ये निर्णायक मतदान होणार

लंडन – ब्रिटनने युरोपिय संघामधून बाहेर पडण्यासाठी केलेल्या सुधारित मसुद्यावर आज ब्रिटनच्या संसदेमध्ये मादान होणार आहे. युरोपिय संघाच्या पदाधिकाऱ्यांशी तब्बल 11 तास वाटाघाटी केल्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा सुधारीत मसुदा तयार केला आहे. या मसुद्यानुसार ब्रिटनला अनिश्‍चित काळासाठी आयर्लंडसाठी खुल्या सीमेशी बांधून ठेवले जाण्याने उद्‌भवणारे संभाव्य धोके कमी करण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे उद्‌भवणाऱ्या कायदेशीर धोके कायमच राहणार आहेत. त्यामुळे या प्रस्तावालाही संसदेत मोठा विरोध होण्याची शक्‍यता आहे.

“बॅकस्टॉप’ अर्थात ब्रिटनला अनिश्‍चित काळासाठी आयर्लंडसाठी खुल्या सीमेशी बांधून ठेवले तर त्याचा वापर युरोपियन महासंघाविरुद्ध वादासाठी केला जाऊ शकतो, असे पंतप्रधान थेरेसा मे म्हणाल्या आहेत. आज रात्री या मसुद्यावरील मतदान होणार आहे.

प्रस्ताव रद्द झाला तर बुधवारी ब्रिटन कोणत्याही तडजोडीविना युरोपियन महासंघातून बाहेर पडेल असा प्रस्ताव आणला जाईल. जर कोणतीच तडजोड न करता हा प्रस्ताव फेटाळला गेला तर खासदार गुरुवारी त्या प्रस्तावावर मतदान करतील. त्याअंतर्गत युरोपिय महासंघाकडून ब्रेक्‍झिटसाठी आणखी वेळ मागितला जाऊ शकतो.

युरोपियन महासंघाचे अध्यक्ष जीअन क्‍लाउड जंकर आणि युरोपियन महासंघाचे ब्रेक्‍झिट सचिव मिशेल बनियर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षांत दोन प्रस्तावांवर सहमती झाली. त्यातील एक करार कायद्याने बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरा करार एका संयुक्त निवेदनाच्या स्वरुपात आहे. त्याचा समावेश राजकीय घोषणांमध्ये केला आहे. घोषणेत डिसेंबर 2020 पर्यंत “बॅकस्टॉप’च्या जागी दुसरी व्यवस्था आणली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. “बॅकस्टॉप’बाबत कायदेशीर बदल असावेत असे खासदारांनी स्पष्ट केले होते. त्या बदलांचा आम्ही समावेश केला आहे. आता या ब्रेक्‍झिटच्या प्रस्तावाला समर्थन करण्याचे आणि ब्रिटनच्या लोकांचे उद्देश पूर्ण करणे हे तुमचे काम आहे. पंतप्रधान थेरेसा मे पुढे म्हणाल्या.

हा प्रस्ताव हाणून पाडला तरी तिसरी संधी मिळणार नाही असे जेकर यांनी खासदारांना सांगितले आहे. असे केले तर ते सगळ्यांनाच अडचणीचे ठरेल. राजकारणात तुम्हाला क्वचितच दुसरी संधी मिळते. पण आम्हाला निवड स्पष्टपणे सांगावी लागेल. एक तर तडजोड होईल किंवा ब्रेक्‍झिट, असे ते पुढे म्हणाले. मजूर पक्षाचे नेते कॉबिन यांनी मात्र खासदारांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान करावे असे आवाहन केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)