ब्रॅड पिटचे नवीन अफेअर सुरू

अँजेलिना जोलीपासून विभक्‍त झाल्यावर अभिनेता ब्रॅड पिटचे नवीन अफेअर सुरू झाले आहे. या नवीन अफेअरमधील ब्रॅड पिटची गर्लफ्रेंड ही ब्युटी ऍन्ड ब्रिलियंट अशी आहे. नेरी ऑक्‍समन असे तिचे नाव असून ती प्रोफेसर आहे. तिचाही एकदा घटस्फोट होऊन गेला आहे. याशिवाय ती एक ऍवॉर्ड विनिंग आर्किटेक्‍ट आणि मॅसेच्युसेटस इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नोलॉजीमधून पी.एचडी प्राप्त प्रोफेसर आहे.

ब्रॅड पिट आणि नेरी यांच्यात दिवसभरात अनेकवेळा बोलणे होते. ब्रॅड पिटतर नेरीच्या प्रेमात पार येडा झाला आहे. नेरीपेक्षा जास्त सेक्‍सी आतापर्यंत कोणी आपल्याला भेटलेच नाही, असे तो म्हणतो आहे. या दोघांची पहिली भेट सहा महिन्यांपूर्वी झाली होती. आर्किटेक्‍ट, डिजाईन आणि आर्टबाबत विलक्षण प्रेम हे समान विषय असल्यामुळे दोघांचे ट्युनिंग लगेचच जुळले. ब्रॅड पिट तर आपल्या या नवीन अफेअरबाबत अजिबातच लपवून ठेवत नाही.

मात्र ब्रॅड पिटबरोबरच्या अफेअरमुळे नेरीच्या भोवती मिडीयाचा गोतावळा वाढायला लागला आहे आणि तिला याचा त्रास व्हायला लागला आहे. अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट हे दोघे सप्टेंबर 2016 मध्ये विभक्‍ता झाले होते. या दाम्पत्याला 6 अपत्ये आहेत आणि अजूनही त्यांच्या कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)