ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून आमदार सौभाग्यवती स्पर्धेत धावणार

सातारा – पश्‍चिम महाराष्ट्रात स्ट्रॉंग ऍण्ड फिटच्या वतीने साताऱ्यात प्रथम फुल सातारा हिल मॅरेथॉनचे 3 मार्च 2019 रोजी आयोजीत केली आहे. देश व परदेशातून सुमारे 2000 स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती स्ट्रॉंग ऍण्ड फिटच्या डायरेक्‍टर प्रीती ठक्कर, रामसिंग यांनी पत्रकार परीषदेत दिली.

दरम्यान या कासपठारावर होणाऱ्या सातारा फुल हिल मॅरेथॉनचे ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सौभाग्यवती श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले धावणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारच्या कास पठाराची जागतिक वारसा स्थळे म्हणून नोंद झाल्यापासून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी याठिकाणी होणाऱ्या विविध स्पर्धेत सहभागी होवून विक्रम केले आहेत. यंदाच्यावेळी प्रथमच कर्तबगार महिलांनी एकत्र येवून स्ट्रॉंग ऍण्ड फिटच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये 10 कि. मी. 21 कि.मी. व 42 कि. मी. असे अंतर असून स्पर्धेसाठी शुल्क आकारण्यात आले आहे.

स्पर्धकांनी संचालिका प्रीती ठक्कर व रामसिंग यांच्याशी संपर्क साधून ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सातारची जनता शारिरीक तंदुरूस्त रहावी यासाठी विविध मॅरेथॉन स्पर्धा होत असतात. परंतु 42 की. मी. स्पर्धा साताऱ्याच्या बाहेर होत असल्याने येथील धावपट्टूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गोवा, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, गुजरात आदी ठिकाणी जावे लागते. आता ही स्पर्धा सातारच्या निसर्गर्रम्य कास पठारावर होत आहे. त्यामुळे स्थानिक धावपट्टूंना सहभागी होता येणार आहे.

यावेळी स्पर्धेच्या ब्रॅंड ऍम्बेसिडर सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलताना म्हणाल्या, सध्या धावपळीच्या जीवनात आरोग्या काळजी घेण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी प्रयत्न गरजेचे आहे. आपल्या साताऱ्यात किमान 30 टक्के नागरीक हे स्वयंस्फुर्तीने व्यायाम करीत असतात. जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

प्रतिकूल वातावरण असताना सुध्दा गोर, गरीब व सर्व सामान्य कुटूंबातील व्यक्ती आरोग्य रक्षणासाठी त्या ठिकाणी आले होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे काही अपंगही स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल्याचे मी पाहिले आहे. त्यामुळे सर्वांनी या स्ट्रॉंग अँण्ड फिटच्यावतीने आयोजीत केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)