ब्रिटींशांची चापलुसी करणाऱ्यांविरोधात लढाई लढणार – अशोक चव्हाण

मोदी सरकारविरोधात “चले जाव’ आंदोलनाची गरज

मुंबई – स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटीशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी सत्तेवर बसून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढाईप्रमाणेच आजच्या सरकारविरोधात “चले जाव’ची लढाई लढावी लागेल. त्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज चव्हाण यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारने पुन्हा पारतंत्र्यासारखी परिस्थिती आणली आहे. देशात 45 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकतायेत.

आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरात आणि राज्यात विविध समाजाचे लोक रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत. महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. लोकांनी काय खायचे? कोणते कपडे वापरायचे? यावर बंधने आणली जात आहेत. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. गोरक्षणाच्या नावाखाली दलित, अल्पसंख्यांक समाजातील निष्पाप लोकांच्या कत्तली केल्या जात आहेत. जमावाकडून निष्पाप लोकांच्या हत्या केल्या जात आहेत.

मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळवत ठेवून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी इतर समाजाच्या नेत्यांना याबाबत विश्वासात घ्यावे व परस्पर सामंजस्याने सरकारचा कुटील डाव हाणून पाडावा. समाजविघातक प्रवृत्तींना चले जाव असे सांगण्याचा संकल्प करून शांतता, अहिंसा, सत्याग्रह, धर्मनिरपेक्ष लोकशाही या मुद्दयांवर अढळ निष्ठा ठेवून त्यासाठी अधिक कटिबध्द होण्याचा आजचा दिवस आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)