ब्रिटिश खासदार लॉर्ड अलेक्‍झांडर विमानतळावरून परत – भारतात प्रवेश नाकारला

लंडन (इंग्लंड) – ब्रिटिश खासदार आणि एक ख्यातनाम वकील लॉर्ड अलेक्‍झांडर यांना दिल्ली विमानतळावरून परत जावे लागले आहे. बुधवारी लॉर्ड अलेक्‍झांडर यांचे विमान दिल्ली विमानतळवर आले होते, परंतु त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे विमानतळावरूनच परत फिरावे लागले.

लॉर्ड अलेक्‍झांड्‍र हे बांगला देशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या ढाक्‍यातील तुरुंगात कैदेत असलेल्या खालिदा झियांची आंतरराष्ट्रीय मीडियासमोर बाजू मांडण्यासाठी लॉर्ड अलेक्‍झांडर दिल्लीत पत्रकार परिषद घेणार होते. एक वकील म्हणून त्यांना ढाक्‍यात प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यामुळे ते भारतात पत्रकार परिषद घेऊ इच्छित होते.

खालिदा झिया यांच्या विरुद्ध तीन डझन गुन्ह्याची प्रकरणे आहेत. राजकारणातून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बाद करण्यासाठी हे षडयंत्र असून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले असल्याचा खालिदा झिया समर्थकांचा आरोप आहे. लॉर्ड अलेक्‍झांडर यांना खालिदा झियांची बाजू आंतरराष्ट्रीय मीडियासमोर मांडायची होती.

लॉर्ड अलेक्‍झांडर यांचा भारतात येण्याचे कारण त्यांनी व्हिसा अर्जात दिलेल्या कारणांशी विसंगत असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)