ब्रिटिश एयरवेजची वेबसाईट हॅक-चार लाख प्रवाशांच्या माहितीची चोरी

लंडन – ब्रिटिश एयरवेजची वेबसाईट हॅक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही वेबसाईट आणि ऍपवरून सुमारे चार लाख प्रवाशांच्या माहितीची चोरी करण्यात आल्याची शंका ब्रिटिश एयरवेजने व्यक्त केली आहे आणि गेल्या काही दिवसांत ब्रिटिश एयरवेजने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या बॅंका आणि क्रेडिट कार्ड प्रदात्यांशी त्वरित संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रिटिश एयरवेजचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी अलेक्‍स क्रूज यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या माहितीबाबत आपली कंपनी गंभीर असल्याचे नमूद करून अलेक्‍स क्रूझ यांनी म्हटले आहे, की वेबसाईट हॅक करून झालेल्या या चोरीमुळे प्रवाशांच्या वित्त्त्तीय माहितीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. हॅकर्सनी प्रवासाची माहिती वा पासपोर्टवरील माहितीची चोरी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या सुमारे 20,000 हजार प्रवाशांची माहिती हॅकर्सनी चोरी केल्याची माहिती एयर कॅनडाने गेल्याच आठवड्यात दिली होती. जुलै महिन्यात आपल्या प्रवाशांची नावे, ई-मेल आणि फ्लाईटसंबधीच्या माहितीची हॅकर्सनी चोरी केल्याचे थॉमस कूकने मान्य केले होते. अमेरिकन विमान कंपनी डेल्टाची माहितीही गेल्या वर्षी सप्टॅंबर आणि ऑक्‍टोबर महिन्यात हॅक करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)