ब्रिटानिया महाराष्ट्रातून प्रकल्प हलविणार 

सरकारकडून वित्तीय सवलती मिळण्यास होत आहे विलंब 

जवळजवळ 300 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नवा उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मात्र, या प्रकल्पाला मिळणाऱ्या वित्तीय सवलतींबाबत महाराष्ट्र सरकारकडून 1 वर्षापासून निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प इतर राज्यांत हलविण्याच्या शक्‍यतेवर आम्ही विचार करीत आहोत. या अनुषंगाने आंध्र प्रदेश सरकारबरोबर सकारात्मक बोलणी चालू आहे. 

नस्ली वाडिया, व्यवस्थापकीय संचालक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज्‌ 

कोलकाता: ग्राहक वस्तू तयार करणारी कंपनी ब्रिटानिया इंटस्ट्रीज महाराष्ट्रात प्रकल्प उभारणार होती. मात्र, महाराष्ट्र सरकार वित्तीय सवलती देण्याचा निर्णय लवकर घेत नसल्यामुळे हा प्रकल्प इतर राज्यांत नेण्याचा कंपनीचा विचार असल्याचे कंपनीने सूचित केले आहे. या प्रकल्पात कंपनी 300 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या सर्वसाधारण सभेत बोलताना कंपनीचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांनी सांगितले की, आम्ही एक वर्षापासून महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची वाट पाहात आहोत. मात्र आम्हाला त्याबाबत आणखी काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही आंध्र सरकारबरोबर बोलणी सुरू केली आहे. त्यामुळे कंपनी आता या विषयावर लवकरच निर्णय घेण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की, कंपनी आगामी काळात एकूण 500 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे. कंपनी आगामी सहा महिन्यात आणखी उत्पादने सादर करणार आहे. त्याचबरोबर भारतातील विविध भागात प्रकल्प उभारण्याची कंपनीने तयारी ठेवली आहे. त्याचबरोबर काही कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनीही असेही सांगितले की, कंपनीचा आगामी काळात निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा विचार आहे. त्यासाठी राज्यात सेझ स्थापन करण्याचा कंपनीचा विचार आहे. निर्यात वाढविण्याकरिता कंपनी बाहेरच्या देशातील कंपन्याचे अधिग्रहणही करू शकते, असे ते म्हणाले. कंपनीने जर सेझ निर्माण केले तर कंपनीला निर्यात करण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. कंपनी या अगोदरच आहे त्या प्रकल्पातून अनेक देशांना निर्यात करीत आहे. शेजमुळे निर्यातीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)