ब्रिटन संसदेबाहेर हल्ल्याचा प्रयत्न; 3 जखमी

लंडन – ब्रिटनच्या संसदेबाहेर एक भरधाव कार सुरक्षा कठड्यांना धडकल्याने तिघेजण जखमी झाले. संसदेच्या इमारतीवर दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या संशयातून 20 वर्षीय युवक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास स्कॉटलंड यार्डच्या दहशतवाद विरोधी विभागाकडूनच केला जात आहे. महानगर सहायक पोलिस आयुक्‍त नील बासू या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याकडेच या विभागाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय संशयिताची ओळख पटवणे हे प्राधान्याचे काम आहे. त्याचा या कृत्यामागील हेतू स्पष्ट होणेही गरजेचे आहे. सध्या तरी हा संशयित चौकशीला सहकार्य करत आहे, असे बासू यांनी सांगितले. संसदेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था किंवा टेहळणी विभागाची क्षेत्रे या चालकाला माहिती नव्हती.

संसदेच्या परिसरामध्ये घातपाती हल्ला होण्याची शक्‍यता वर्तवणारा कोणताही गुप्तचर इशारा मिळालेला नव्हता. ही कार मुद्दाम धडकवण्यात आली होती. त्यावरून याला दहशतवादी हल्ला म्हणता येऊ शकेल, असेही ते म्हणाले. कारमध्ये अन्य कोणीही नव्हते. कोणतेही शस्त्र अथवा स्फोटकेही नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)