ब्रिटन-रशिया वादात भारताची उडी : मोदी-पुतिन यांच्यातील बोलणी चर्चेत…

लंडन (ब्रिटन) – डबल एजंट सर्गीए स्क्रिपाल आणि त्याची मुलगी यूलिया यांच्यावर झालेल्या रासायनिक हल्ल्यामुळे ब्रिटन आणि रशिया यांच्यातील संबंधात कमालीचा तणाव आलेला आहे. त्याचे रूपांतर युरोपियन समुदाय विरुद्ध रशिया असे होऊ पाहत आहे. या वादात आता भारतानेही उडी घेतली आहे. रासायनिक हत्यारांच्या वापराच्या आपण विरोधात असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. रासायनिक हत्यारांचा मुद्दा ब्रिटन पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टेलोफोनवरून तपशीलवार चर्चा केली आहे. भारत-रशिया संबंध आणि आंतरराष्ट्रीय मंचावर परस्पर सहकार्य यावर त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. 11 एप्रिल रोजी या दोन नेत्यांमध्ये बोलणी झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले असले, तरी त्याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
रशियन डबल एजंटवर लंडनमध्ये विषप्रयोग झाल्यानंतर पाश्‍चिमात्य राष्ट्रे आणि रशिया यांच्यातील विवाद चरमसीमेवर असताना मोदी आणि पुतीन यांच्यातील चर्चेला अधिकच महत्त्व आलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)