ब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा 

चार मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे थेरेसा मे यांना मोठा धक्का 

लंडन: “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी मतभेद झाल्याने ब्रिटनच्या संसदेतील भारतीय वंशाचे मंत्री शैलेश वारा यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह एकूण चार मंत्र्यांनी आपापले राजीनामे देऊ केले आहेत. वारा यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही मिनिटातच ब्रेक्‍झिट विषयाचे सेक्रेटरी डोमिनिट राब यांनीही मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. युरोपिय संघातून बाहेर पडण्याआठी केल्या गेलेल्या कराराला आपण पूर्ण विवेकाने पाठिंबा देऊ शकत नाही, असे कारण त्यांनी दिले आहे.

-Ads-

“ब्रिटन हा पूर्ण स्वायत्त देश आहे. आपल्या हितांचा विचार न करता इतर देशांनी केलेल्या नियमांना आधीन राहावे लागणे ही वाईट बाब आहे. आपण युरोपिय संघापेक्षा अधिक चांगले करू शकतो. आपण अधिक चांगले केलेच पाहिजे. ब्रिटनच्या नागरिकांना अधिक चांगल्या गोष्टी मिळणे हा हक्कच आहे.’ असे वारा म्हणाले.
वायव्य केंब्रिजशायर येथील खासदार असलेल्या वारा यांच्याकडे जानेवारीपासून उत्तर आयर्लंडचा कार्यभार सोपवण्यात आला होता.

युरोपिय संघातून मार्च 2019 मध्ये बाहेर पडण्याच्या प्रक्रियेविषयीचा कराराचा मसुदा अर्धवट असल्याची टीका वारा यांनी केली आहे. या करारानुसार ब्रिटन स्वायत्त देश कधी बनणार याबाबत कोणतीही कालमर्यादा स्पष्ट नसल्याचे ते म्हणाले. त्यांच्या पाठोपाठ राब यांनीही राजीनामा दिल्यावर कार्य आणि पेन्शन मंत्री एस्थर मॅक्‍वे आणि ब्रेक्‍झिट विषयीचे अन्य एक कनिष्ठ मंत्री सुएल्ला ब्रावेरमन यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

या राजीनामा सत्रामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला आहे. थेरेसा मे यांच्या “ब्रक्‍झिट’ मसुद्याला खीळ बसण्याची लक्षणे यामुळे निर्माण झाली आहे. मात्र मे यांनी आपल्याच मसुद्याप्रमाणे युरोपिय संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया पार पडेल याचा पुनरुच्चार केला आहे. या करार मसुद्यावर मंत्रिमंडळाला चर्चा करायचीच नाही. याच करार मसुद्यानुसार “ब्रेक्‍झिट’ होईल किंवा “ब्रेक्‍झिट’ होणारच नाही, असा गर्भित इशाराच त्यांनी देऊन टाकला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)