ब्रिटनच्या संसदेने “ब्रेक्‍झिट’चा मसुदा पुन्हा फेटाळला; आता “ब्रेक्‍झिट’साठी मुदतवाढ मागण्याची नामुष्की

आज पुन्हा होणार मतदान

थेरेसा मे यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का

लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला “ब्रेक्‍झिट’चा महत्वपूर्ण मसुदा ब्रिटन संसदेने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. आता 29 मार्च पूर्वी कोणतीही तडजोड होऊ शकणार नाही. त्यामुळे ब्रिटनने नियोजित कालमर्यादेनंतर युरोपिय संघातून बाहेर पडू नये, या प्रस्तावासाठी संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये आज पुन्हा एकदा मतदान केले जाणार आहे.

बाहेर पडायचे की नाही…?
23 जून 2016 रोजी झालेल्या सार्वमतात ब्रिटनच्या नागरिकांनी 52 टक्के विरुद्ध 48 टक्के अशा बहुमताने 28 देशांच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला. यामुळे हुजूर पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. त्यामुळे युरोपीय महासंघात राहण्याला पाठिंबा दिल्यामुळे मंत्री थेरेसा मे या पंतप्रधान झाल्या. सरकारने निश्‍चित केलेल्या दोन वर्षांच्या वेळापत्रकानुसार ब्रिटनला येत्या 29 मार्चला महासंघातून बाहेर पडावे लागणार आहे. त्यापूर्वी ब्रिटन संसदेमध्ये हा करार मंजूर होणे आवश्‍यक होते. आता ब्रिटनने विनंती केल्यास मुदतवाढ दिली जाईल. मात्र, असे करण्यासाठी ब्रिटनला महासंघातील 27 सदस्य देशांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे महासंघातील सूत्रांनी सांगितले.

थेरेसा मे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर काल झालेल्या महत्वाच्या मतदानाकडे सर्व ब्रिटनचे लक्ष लागून राहिले होते. मात्र 242 विरुद्ध 341 अशा मोठ्या फरकाने ब्रिटनच्या खासदारांनी हा प्रस्ताव नाकारला. याआधी जानेवारीत त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.

थेरेसा मे यांचा हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता 29 मार्चला कोणतीही तडजोड न करता युरोपियन महासंघातून बाहेर पडायचे किंवा ब्रेक्‍झिट टाळता येईल की नाही हे ठरवावे लागणार आहे. त्यानुसाऱ्‌ खासदारांनी प्रस्तावित बदल स्वीकारावा किंवा सरसरकट ब्रेक्‍झिटलाच नकार द्यावा असे आवाहन मे यांनी केले होते. त्यानुसार आता “कोणतीही तडजोड नाही’ हे स्पष्ट करण्यासाठीच्या प्रस्तावावर आज पुन्हा मतदान होणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)