ब्रिटनच्या संसदीय समितीकडून मार्क झुकेरबर्गला समन्स

लंडन : अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘फेसबुक’वरील पाच कोटी नागरिकांचा तपशील केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला पुरवल्याप्रकरणी ब्रिटनच्या संसदीय समितीने ‘फेसबुक’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना समन्स बजावले आहे.

ब्रिटनच्या माहिती आयुक्त एलिझाबेथ डेन्हम यांनी न्यायालयात कंपनीच्या सर्च वॉरंटसाठी धाव घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संसदीय समितीने हे पत्र झुकेरबर्ग यांना पाठविले होते. अॅनालिटिकाने ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील बेकायदा मिळवल्याचे वृत्त ‘ऑब्झर्व्हर’ने दिले होते. दरम्यान, या घटनेनंतर फेसबुकला ३९५ अब्जावधीचा तोटा झाला होता तर, लाखो युझर्सने आपले फेसबुकचे खाते बंद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)